स्टीव्हन जॉन्सन - लेख सूची

मनकवडे- ‘मनांधळे’

माणसे स्वभावतःच मनकवडी असतात. इतरांचे मनोव्यापार कल्पनेने तपासण्याचे माणसांचे कौशल्य हे भाषेचा वापर किंवा बोटांपुढे आणता येणाऱ्या अंगठ्याच्या दर्जाचे मानवी वैशिष्ट्य आहे. ते इतक्या सहजपणे आपण वापरत असतो की तसले काही कौशल्य आहे हेच आपल्याला सुचत नाही. पण चार वर्षांच्या मुलाचे या क्षेत्रातले कौशल्य बहुतांश प्राण्यांमध्ये आढळत नाही. आपण जगात येतो तेच ‘इतर मनांचे आराखडे’ …